Thursday, December 24, 2020

सेवाजेष्ठता यादी माहिती करिता लिंक -शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,.

  शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,प्राथ. शिक्षक (जि.प.) 
सेवाजेष्ठता यादी माहिती करिता लिंक.

 जि.प.वाशिम सर्व माध्यम मराठी उर्दू  मधील शिक्षक/केंद्रप्रमुख यांचे करीता 


              शिक्षणाधिकारी (प्राथ.)  शिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम  कडून शिक्षकांच्या पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी व नव्याने माहिती तयार करण्यासाठी खालील लिंक देण्यात येत आहे लिंक मधील माहिती सर्व माध्यम मराठी उर्दू  सर्व शिक्षकांनी  स्वतः भरावयाची असून माहितीची स्वतः खात्री करूनच भरावी.लिंक भरतांना अडचण आल्यास इतर तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी. संदर्भासाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेली सेवाजेष्ठता यादी PDF स्वरूपात आपल्या माहितीसाठी व चुकीची माहिती भरल्या जाऊ नये म्हणून खालील निळ्या लिंकला क्लिक केल्यानंतर पाहावयास मिळेल- आपण यादीतील माहिती चुकीची असल्यास दुरुस्त करून व चूक नसल्यास जशीच्या तशी व इतर पूरक माहिती भरावी. सर्व शिक्षकांनी ही माहिती भरणे आवश्यक आहे. चुकीची माहिती भरल्यास आपली स्वतःची माहिती चूक होईल. व पुढील लाभापासून स्वतः वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी .कोणीही कार्यालयाची दिशाभूल करणारी माहिती भरू नये, सदर माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे . तसे आढळल्यास दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. विहित कालावधीत माहिती भरतांना चूक झाल्यास Submit केल्यानंतरही विहित कालावधीत स्वतःला त्याच लिंक वर जाऊन  दुरुस्ती Edit करता येईल.

                                                                                                                        आदेशावरून 

शिक्षणाधिकारी (प्राथ)  जि -प-वाशीम 

                                                                            👇

लिंक भरण्यासाठी येथे क्लिक करा 


    👇

01/01/2019 ची  सेवाजेष्ठता यादया पाहण्यासाठी येथे क्लिक करा