झटपट करा तयार आपल्या वर्गाचा निकाल
सहज सोप्या पद्धतीने झटपट करा तयार आपल्या वर्गाचा निकाल , एकदा माहिती भरा मूल्यमापन पंजी, गुणपत्रिका(मार्कशिट ) ,शाळा सोडल्याचा दाखला T.C., निकालपञक ,सञनिहाय निकालपञक ,विषयनिहाय,जातनिहाय श्रेणी तक्ता, ,शाळा सोडल्याचा दाखला मुखपृष्ठ, मलपृष्ठ सर्व आपोआप तयार होईल. त्यासाठी खाली क्लिक करा
CCE 2020-21 निकाल पत्रक कोरोना काळातील सूचनेनुसार तयार केलेले
- प्रत्येक इय्यत्तेसाठी स्वतंत्र फाईल करावी.
- हि फाईल Micro Enabled असल्याने संगणकावर किंवा Laptop वर काम करता येईल
- Open केल्यानंतर सर्वप्रथम वर्ष व वर्ग निवडा वर्गानुसार विषय आपोआप येतील.
- शाळेचे माहिती,शिक्षक व विदयार्थ्यांची आवश्यक माहीती एकदाच सर्वप्रथम भरा. इतर ठिकाणी कोठेही पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही"
- आपल्याकडे संगणकावर नावे Save असतील व ती या फाईलमध्ये Paste करायची असतील तर Direct Paste न करता आपल्या फाईलवरून माहिती Copy करावी व Paste करतांना right click करून paste special हे option निवडावे त्यातून Values हे option निवडावे व Ok करावे त्यामुळे माहिती पेस्ट होईल व या फाईलमध्ये कोणतेही अनावश्यक बदल घडणार नाहीत.
- सर्व गुणनोंद तक्ते Auto Link केलेले आहेत, Protected आहे.
- सर्व शीट्स हे Legal साईज मध्येच आहेत.फक्त मार्कशिट व शाळा सोडल्याचा दाखला T.C.हे दोनच Sheet A4 किंवा Letter पेज वर प्रिंट करा. जास्तीतजास्त 25 विद्यार्थ्यांसाठीच हि फाईल आहे.
- त्यानंतर सञनिहाय व विषयनिहाय आकारीक व संकलित झालेली असल्यास संकलितच्या विषयनिहाय गुणदान तक्त्यामध्ये आकारीकचे विविध तंञ दिलेले आहेत त्यापैकी, कमीत कमी चार विविध तंञ वर्गनिहाय निवडा.वर्ग निवडल्यानंतर वरील कोप-यात आकारिकचे एकूण गुण नियमानुसार वर्गनिहाय किती पाहिजे ते दिलेले आहेत.तेवढ निवडलेल्या चार तंञाला पैकी गुण भरा व विद्यार्थ्यासमोर फक्त गुण भरा. त्या सेल ओपन ठेवलेल्या आहे.
- एकूण गुण ,श्रेणी ,विषयनिहाय सञनिहाय गुणांकन तक्ता,प्रथम सञ निकालपञक ,द्वितीय सञ निकालपञक ,विषयनिहाय,जातनिहाय श्रेणी तक्ता,मार्कशिट,शाळा सोडल्याचा दाखला मुखपृष्ठ, मलपृष्ठ सर्व आपोआप तयार होईल.
- मार्कशिट,शाळा सोडल्याचा दाखला पाहीजे असल्यास त्यासाठी आवश्यक माहीती शाळा माहिती व विदयार्थी माहिती मध्ये भरावी.पाहिजे नसल्यास ती माहीती भरण्याची आवश्यकता नाही.
- खालील लिंक वर क्लिक करा व फाईल डाउनलोड करा ⇓
- काही समस्या आल्यास खालील नंबरवर संपर्क करू शकता किंवा Whatsapp करू शकता
निर्मिती :-जगन्नाथ विठोबा आरू |
(प्रभारी मुख्याध्यापक /पदविधर शिक्षक) जि.प.व.प्राथ.शाळा सोनखास.
पं.स.वाशिम, जि.प.वाशिम.https://jaganaru.blogspot.com
Mob-8275286836/7020945857
No comments:
Post a Comment